Home मावळ आंदर मावळातून सुनील शेळकेंचा दमदार प्रचार दौरा सुरु ‘अण्णा तुम्हीच होणार...

आंदर मावळातून सुनील शेळकेंचा दमदार प्रचार दौरा सुरु ‘अण्णा तुम्हीच होणार आमदार’ च्या ठिकठिकाणी घोषणा

96
0

तळेगाव,दि 10 आॅक्टोबंर 2019(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-  फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांच्या गजरात ‘अण्णा तुम्हीच होणार आमदार’ अशा घोषणांनी आंदर मावळ परिसर दुमदुमून गेला. मावळ मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस- एसआरपी व मित्र पक्षांच्या महाआघाडीचे उमेदवार सुनील शेळके यांच्या आंदर मावळ भागातील प्रचारास बुधवारी सकाळपासून सुरुवात झाली. यावेळी गावांमधून सुनील अण्णांचे उत्स्फूर्त व जंगी स्वागत झाले.
यावेळी बोलताना शेळके यांनी या भागातील समस्यांवर प्रकाश टाकला. गेली अनेक वर्षे  इंद्रायणी पुलाची समस्या जशीच्या तशी आहे. कान्हे फाटा रेल्वे गेटच्या उड्डाणपुलाचे कामही रखडले आहे. रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. खड्डे वाढत चालले आहेत. नाला दोनवेळा फुटला आहे. या समस्यांकडे विद्यमान आमदारांचे लक्ष नाही. इथल्या कामांसाठी फक्त जिल्हापरिषदेचा निधी वापरला जातो. मग खासदार निधी आणि आमदार निधी जातो कुठे? असा खणखणीत सवाल सुनील अण्णांनी यावेळी केला. तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध आहे. या भागाचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही. गाव-गावात सर्व सुविधा पोहोचविणार असे सूतोवाच शेळके यांनी यावेळी केले.  
टाकवे बुद्रुकपासून सुरु झालेला हा प्रचार दौरा पारवाडी, कोंडीवडे, फळणे, दवणेवाडी, माऊ या गावांमधून पुढे गेला. याप्रसंगी राष्ट्रवादीचे नेते बापूसाहेब भेगडे, गणेश खांडगे, सहकार सेलचे अध्यक्ष नामदेव शेलार, अंकुश आंबेकर, रघुनाथ अस्वले, राजू अस्वले, रघुनाथ मालपोटे, अनिल मालपोटे, किशोर सातकर, शांताराम लष्करे, विकास मालपोटे, नारायण ठाकर, तुकाराम अस्वले, सुदाम गाडेकर, सुदाम आलम, मदन आलम, गबाजी पिंगळे, भगवान शिंदे, कैलास खांडभोर, विठ्ठल जाधव उपस्थित होते. दौऱ्यातील प्रत्येक गावात थांबून शेळके यांनी नागरिकांशी संवाद साधला. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. नागरिकांनीही मनमोकळेपणाने अण्णांबरोबर आपल्या भावना व्यक्त केल्या. आपल्या समस्या मांडल्या. तालुक्याच्या विकासाकरिता झटणाऱ्या शेळके यांच्यासोबत आपण असून यावेळी ‘अण्णा तुम्हीच होणार आमदार’ अशा उत्स्फूर्त घोषणाही गावकऱ्यांनी दिल्या. 
मोरमारेवाडी, गाभालेवाडी  येथेही सुनील अण्णा शेळके यांचे जोरदार स्वागत झाले. यावेळी मंगरुळचे जिल्हापरिषद सदस्य सुदामराव कदम, शोभा कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. मोरमारेवाडीतील एकनाथ मोरमारे, मच्छिन्द्र मोरमारे, शंकर खाडे, संदीप मोरमारे, दिनेश मोरमारे, गणेश मोरमारे, तानाजी मोरमारे, अरुण मोरमारे यांनी शेळके यांचे स्वागत करून त्यांना पाठिंबा दिला. गभालेवाडीतही सुनीलअण्णांचे जोरदार  स्वागत झाले.  यावेळी किसन गवारे,  गुलाब गभाले,  तुकाराम गभाले,  रामदास गभाले,  नितीन गभाले आदी उपस्थित होते.  

 फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांच्या गजरात ‘अण्णा तुम्हीच होणार आमदार’ अशा घोषणांनी आंदर मावळ परिसर दुमदुमून गेला. मावळ मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस- एसआरपी व मित्र पक्षांच्या महाआघाडीचे उमेदवार सुनील शेळके यांच्या आंदर मावळ भागातील प्रचारास बुधवारी सकाळपासून सुरुवात झाली. यावेळी गावांमधून सुनील अण्णांचे उत्स्फूर्त व जंगी स्वागत झाले.
यावेळी बोलताना शेळके यांनी या भागातील समस्यांवर प्रकाश टाकला. गेली अनेक वर्षे  इंद्रायणी पुलाची समस्या जशीच्या तशी आहे. कान्हे फाटा रेल्वे गेटच्या उड्डाणपुलाचे कामही रखडले आहे. रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. खड्डे वाढत चालले आहेत. नाला दोनवेळा फुटला आहे. या समस्यांकडे विद्यमान आमदारांचे लक्ष नाही. इथल्या कामांसाठी फक्त जिल्हापरिषदेचा निधी वापरला जातो. मग खासदार निधी आणि आमदार निधी जातो कुठे? असा खणखणीत सवाल सुनील अण्णांनी यावेळी केला. तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध आहे. या भागाचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही. गाव-गावात सर्व सुविधा पोहोचविणार असे सूतोवाच शेळके यांनी यावेळी केले.  
टाकवे बुद्रुकपासून सुरु झालेला हा प्रचार दौरा पारवाडी, कोंडीवडे, फळणे, दवणेवाडी, माऊ या गावांमधून पुढे गेला. याप्रसंगी राष्ट्रवादीचे नेते बापूसाहेब भेगडे, गणेश खांडगे, सहकार सेलचे अध्यक्ष नामदेव शेलार, अंकुश आंबेकर, रघुनाथ अस्वले, राजू अस्वले, रघुनाथ मालपोटे, अनिल मालपोटे, किशोर सातकर, शांताराम लष्करे, विकास मालपोटे, नारायण ठाकर, तुकाराम अस्वले, सुदाम गाडेकर, सुदाम आलम, मदन आलम, गबाजी पिंगळे, भगवान शिंदे, कैलास खांडभोर, विठ्ठल जाधव उपस्थित होते. दौऱ्यातील प्रत्येक गावात थांबून शेळके यांनी नागरिकांशी संवाद साधला. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. नागरिकांनीही मनमोकळेपणाने अण्णांबरोबर आपल्या भावना व्यक्त केल्या. आपल्या समस्या मांडल्या. तालुक्याच्या विकासाकरिता झटणाऱ्या शेळके यांच्यासोबत आपण असून यावेळी ‘अण्णा तुम्हीच होणार आमदार’ अशा उत्स्फूर्त घोषणाही गावकऱ्यांनी दिल्या. 
मोरमारेवाडी, गाभालेवाडी  येथेही सुनील अण्णा शेळके यांचे जोरदार स्वागत झाले. यावेळी मंगरुळचे जिल्हापरिषद सदस्य सुदामराव कदम, शोभा कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. मोरमारेवाडीतील एकनाथ मोरमारे, मच्छिन्द्र मोरमारे, शंकर खाडे, संदीप मोरमारे, दिनेश मोरमारे, गणेश मोरमारे, तानाजी मोरमारे, अरुण मोरमारे यांनी शेळके यांचे स्वागत करून त्यांना पाठिंबा दिला. गभालेवाडीतही सुनीलअण्णांचे जोरदार  स्वागत झाले.  यावेळी किसन गवारे,  गुलाब गभाले,  तुकाराम गभाले,  रामदास गभाले,  नितीन गभाले आदी उपस्थित होते.  

Previous articleप्रचार नारळ फोडून विलास लांडे यांच्या विजयाचा भोसरीकरांचा निर्धार
Next articleपिंपरी विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार ॲड. गौतम चाबुकस्वार यांना एक लाखाच्या मताधिक्याने निवडून आणण्याचा संकल्प निर्धार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

2 × four =