Home औरंगाबाद भारिप वंचित बहुजन आघाडी चे अॅड प्रकाश आंबेडकर आणि एमआय एम...

भारिप वंचित बहुजन आघाडी चे अॅड प्रकाश आंबेडकर आणि एमआय एम चे असदुद्दी ओवेसी हे एकञ आल्याने अनेकांच्या पोटात आला गोळा

86
0

औरंगाबाद(प्रजेचा विकास प्रतिनिधी)-मोदी सरकारची फौज ही बहुजन आणि मुस्लिम समाजावर अन्याय करत आहे. आता ही सत्ता उलथवून आणण्याची वेळ आलीये अशी दणकेबाज टीका एमआयएमचे खासदार असादुद्दीन ओवेसी यांनी केली. तसंच मोदी सरकारमुळे दलित- बहुजन समाज पीडित आहे अशी टीकाही ओवेसींनी केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला संविधान दिलं असून संविधानाचं संरक्षण करण्याची वेळ आली आहे असेही ते म्हणाले
देशाला राज्यघटना ही बाबासाहेब आंबेडकर यांनी दिली. नेहरू, गांधी, मोदी यांनी संविधान दिलं नाही, मग आंबेडकरांचेच अनुयायी अन्याय सहन का करताय असा सवाल करत असादुद्दीन ओवेसी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला.
अॅड.प्रकाश आंबेडकर जिथं जिथं जातील एमआयएम त्यांच्या पाठीशी उभं राहणार, वंचित समाजाला आंबेडकरच न्याय देऊ शकतात असे ओवेसी म्हणाले.
तसंच अन्याय करणाऱ्यांच्या अन्याय संपवायची वेळ आता आली आहे, आणि ही आपली जबाबदारी आहे,आता या सरकारला हद्दपार करण्याची
तर प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या भाषणात मोदींवर कडाडुन टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पैसे खात नाहीत पण ते दुसऱ्यांना पैसै खावू देतात आणि त्यातला हिस्सा घेतात असा आरोप अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला.
ते म्हणाले बहुजन वंचित आघाडीचा सर्वच राजकीय पक्षांनी धसका घेतला आहे. येणाऱ्या निवडणुकीत आम्ही आमची ताकद दाखवून देवू. भाजपच्या तोड फोडीच्या राजकारणामुळे देश फुटीच्या उंबरठ्यावर उभा आहे.
मुसलमानांना देश सोडा असं सांगणारे भाजपवाले आहेत कोण? असा सवाल त्यांनी केला. २०१९ च्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना खाली खेचणार आहोत. सत्ताधाऱ्यांनी मालकासारखं नाही तर सेवकासारखं वागावं नाहीतर तुम्हाला सालगडी बनवू असा इशाराही दिला.नक्षलवाद्यांविरोधात कारवाई केली जाते पण ‘सनातन’च्या विरोधात का केली जात नाही. त्यांच्याकडे बॉम्ब आले कुठून असा सवालही त्यांनी सरकारला केला. प्रकाश आंबेडकर यांनी एमआयएमला आघाडीत सामील करून घेतल्यानंतर काँग्रेसने त्यांना चर्चेचं निमंत्रण दिलं होतं
रावसाहेब दाणवेंचे शेतकर्‍यांबद्दलचे वक्तव्य अत्यंत संतापजनक आहे. पाच वर्षांसाठी सत्ता तुमच्या हातात दिली होती. पाच वर्षांनंतर तुमचे लायसन्स रिनिव्ह करायचे की नाही हे आता आम्ही ठरविणार आहे. त्यामुळे भाजप नेत्यांनी मालकासारखे वागू नये, आंबेडकरांनी सांगीतले.
मोदी सरकारमुळे वंचित, दलित आणि बहुजन पीडित आहेत. भाजपच्या काळात वंचित, बहुजनांवर सर्वात जास्त अन्याय झाला आहे. अन्याय संपविण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रकाश आंबेडकरांच्या पाठीशी उभे राहाण्याची गरज आहे. आता वंचित, बहुजन दलितांचे एकीचे बळ दिसेल, असे ओवेसींनी सांगितले.
दरम्यान, आगामी निवडणुकीत एमआयएम व भारिप बहुजन महासंघाने हातमिळवणीची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर या दोन्ही पक्षांचे प्रमुख अॅड. असदुद्दीन ओेवेसी व अॅड. प्रकाश आंबेडकर यांची राज्यातील पहिली संयुक्त सभा औरंगाबादेतील जबिंदा लॉन्सवर होत आहे. राज्यातील राजकारणाला कलाटणी देणारी ठरेल. कोणी काहीही म्हणत असले तरी ही आघाडी राजकीय चित्र बदलणार आहे. वंचित समाजाच्या काही नेत्यांना पुढे करून निवडणुका लढल्या जातात. सत्ता आल्यावर या नेत्यांनाही नाकारले जाते, ही स्थिती आता बदलेल.
भारिप आणि एमआयएमच्या बहुजन वंचित विकास आघाडीची पहिली जाहीर सभा पार पडली. यावेळी लाखोंच्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते.
तसेच, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार मानणाऱ्या लोकांनाच थारा द्या, असं आवाहन एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी केलं.
“देशाला आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या किंवा मोदींच्या विचारांची नाही, तर आंबेडकरांच्या विचारांची गरज आहे. गेली अनेक वर्ष सत्तेत असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीलाही आंबेडकरी जनता आणि मुस्लिमांचा विसर पडला आहे.”, असा आरोप ओवेसी यांनी केला.
निवडणुकीला उणेपुरे 5-6 महिने राहिलेत. त्याआधी भारिप बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे असदुद्दी ओवेसी एकत्र झालेत. त्यामुळे भाजप आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या पोटात गोळा आलाय.मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात मुस्लिम आणि अनुसुचित जाती-जमातींचा मोठा समुदाय आहे. त्यामुळे ही मतं आंबेडकरांसोबत गेली, तर मतांमध्ये फूट पडेल आणि काँग्रेस-राष्ट्रवादीची डोकेदुखी नक्की वाढेल. निवडणुकीच्या राजकारणात
जात फॅक्टर महत्वाचा आहे. त्यामुळे समुदायानुसार जर ताकदीचा अंदाज घेतला तर, मुस्लिम समाज 8 टक्के, बौद्ध 6 टक्के, इतर दलित 6 टक्के, आदिवासींची संख्या 8 टक्के इतकी आहे. त्यामुळे या 28 टक्के व्होटबँकेत आंबेडकर-ओवेसी मोठे भागीदार असतील.
दलित-मुस्लिम ऐक्याचा हा पहिला प्रयोग नाहीय. याआधी 30 वर्षांपूर्वी कुख्यात हाजी मस्तान आणि जोगेंद्र कवाडेंनी हातमिळवणी केली होती. त्यांनी दलित मुस्लिम मुक्ती सेना स्थापन केली होती. पण संघटनात्मक बांधणी नसल्या मुळे आणि लोकांचा पाठिंबा नसल्यानं ती फेल ठरली. 30 वर्षानंतर आता पुन्हा आंबेडकर आणि ओवेसी एकत्र येत आहेत. प्रयोग सेम आहे. पण दोघांची ताकद जास्त आहे.महाराष्ट्र विधानसभेत एमआयएमचे दोन आमदार आहेत. औरंगाबाद पालिकेत एमआयएमचे 24 नगरसेवक आहेत. भारिप बहुजनचे बळीराम शिरसकर विधानसभेत आहेत. कधीकाळी सत्ता असलेल्या अकोला पालिकेत भारिप बहुजनचे 3 सदस्य आहेत. भारिप-बहुजनचा अकोला, वाशिम, बुलढाण्यात प्रभाव आहे. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात ओवेसींना प्रतिसाद मिळतो.त्यामुळे भारिप-बहुजन महासंघ आणि एमआयएम युतीचा राज्याच्या राजकारणावर किती फरक पडतो, हे येणार काळच ठरवेल.

Previous articleप्रकाश आंबेडकरांच्या सोलापूर सभेमुळे अनेकांना धडकी भरली, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या राजकीय स्वातंत्र्याची जाणीव करून देण्याचे काम भारिपचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सुरू केले आहे
Next article*61 व्या वर्धापन दिन सोहळ्यात ठाण्यात रिपब्लिकन पक्षाचे प्रचंड शयीप्रदर्शन* *संविधान ही आमची जान – केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले* *गीता बायबल पेक्षा संविधान आम्हाला प्यारे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

sixteen − thirteen =