Home ताज्या बातम्या देहुरोड येथे अज्ञात टोळक्यांकडून दोन दुचाकी, एटीएमची तोडफोड

देहुरोड येथे अज्ञात टोळक्यांकडून दोन दुचाकी, एटीएमची तोडफोड

0

देहुरोड पिंपरी-चिंचवड परिसरात वाहनांच्या तोडफोडीच्या घटनांमुळे नागरिक भीतीच्या सावटाखाली वावरत आहेत. या घटनांचे सत्र कायम आहे. देहुरोड येथे शुक्रवारी (दि. २५) रात्री अकराच्या सुमारास अबुशेठ रस्त्यावर दोन दुचाकींची तोडफोड करून एटीएमची तोडफोड करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री अज्ञात टोळक्यांनी दोन दुचाकी आणि एटीएमची तोडफोड केली. अद्याप या प्रकरणी कोणालाही ताब्यात घेण्यात आलेले नाही. या प्रकारामुळे या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. नागरिकांनी या घटना रोखण्याची मागणी केली आहे.

देहुरोड परिसरात टोळक्याची दहशत इतकी वाढली आहे की, सर्वसामान्य नागरिकांना जीव मुठीत घेऊन वावरावे लागत आहे. वाहनांची तोडफोड, हातात तलवारी घेऊन दहशत माजवणे, मारहाण करणे, या प्रकारामुळे स्थानिक नागरिक वैतागले आहेत. अशा घटनांना तत्काळ आळा घालण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

three × four =