रावेत-किवळे,दि.२२ डिसेंबर २०२५(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- देशात लोकशाहीचा उत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निवडणुकांच्या काळात काही गृहनिर्माण सोसायट्यांमधून चिंताजनक प्रकार समोर येत आहेत. मतदान मिळवण्यासाठी उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींनी मतदारांशी संवाद साधावा, ही लोकशाहीची मूलभूत प्रक्रिया असताना, काही सोसायटी धारकांकडून अशा भेटीगाठींवर थेट मज्जाव करण्यात येत असल्याचे चित्र दिसत आहे.माञ महानगरपालिकेच्या सुखसुविधा पाहिजे माञ महापालिका निवडणुक प्रक्रिया चालत नाही.मतदारांपर्यंत पोहचणे हे आहे.माञ असा प्रकार घडताना दिसत आहे.हे लोकशाहीला घातक आणि देशद्रोही कृत्य आहे.याने लोकशाहिला काळीमा लागेल.
सोसायटीच्या नावाखाली उमेदवार, कार्यकर्ते किंवा लोकप्रतिनिधींना प्रवेश नाकारला जात असून, त्यामुळे मतदारांचा थेट संपर्क तुटत आहे. हा प्रकार केवळ लोकशाही मूल्यांना विरोधी नसून, निवडणूक प्रक्रियेवर हुकुमशाही पद्धतीने निर्बंध लादण्याचा प्रकार असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
लोकशाहीत मतदारांना माहिती मिळण्याचा, प्रश्न विचारण्याचा आणि उमेदवारांची भूमिका समजून घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. मात्र काही सोसायटी धारक स्वतःच्या निर्णयाने हा अधिकार हिरावून घेत असल्याचे दिसत असून, त्यामुळे लोकशाहीच्या स्वातंत्र्यावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी अशा प्रकारांचा निषेध व्यक्त करत, निवडणूक आयोग व संबंधित प्रशासनाने याची तात्काळ दखल घ्यावी अशी मागणी केली आहे. लोकशाहीला काळीमा फासणाऱ्या आणि निवडणूक प्रक्रियेत अडथळे निर्माण करणाऱ्या सोसायटी धारकांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी होत आहे.
लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी प्रत्येक मतदाराचा अधिकार सुरक्षित राहणे अत्यावश्यक असून, कोणालाही हुकुमशाही पद्धतीने लोकशाहीवर बंधने घालण्याचा अधिकार नाही, असा ठाम सूर यानिमित्ताने उमटत आहे.या सर्व गोष्टीवर निवडणूक आयोग काय निर्णय घेणार सर्व सोसायटी धारकांना नोटीस धाडणार की लोकशाहीचा उत्सवाला गालबोट लावणार,त्यामुळे सर्व मतदारांन मध्ये आणि लोकप्रतिनिधीन मध्ये संभ्रम आहेत.





