Home ताज्या बातम्या उपस्थिती नव्हे, विश्वासच ठरला ताकदीचा पुरावा; अनुप मोरे यांच्या नेतृत्वाचा पुन्हा ठसा

उपस्थिती नव्हे, विश्वासच ठरला ताकदीचा पुरावा; अनुप मोरे यांच्या नेतृत्वाचा पुन्हा ठसा

0

चार दिवसांत अनेक घडामोडी; पण प्रभाग १५ ने दाखवले — ‘जहां भरोसा होता है, वहां मौजूदगी की जरूरत नहीं होती!’

निगडी,दि.०३ नोव्हेंबर २०२५(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-निगडी प्राधिकरणात झालेल्या भाजप कार्यकर्ता मेळाव्यात भाजयुमो प्रदेशाध्यक्ष आणि प्रभाग क्रमांक १५ चे मुख्य संयोजक अनुप मोरे यांची अनुपस्थितीही कार्यकर्त्यांच्या उत्साहावर परिणाम करू शकली नाही. उलट, त्यांच्या अनुपस्थितीतही कार्यकर्त्यांचा जोश आणि निष्ठा पाहून सर्वजण थक्क झाले.

मेळाव्याच्या आमंत्रणपत्रिका आणि बॅनरवर त्यांचे नाव प्रमुख आयोजक व मार्गदर्शक म्हणून झळकत असल्याने त्यांच्या उपस्थितीची अपेक्षा होती. मात्र, आयोजकांनी सांगितले की “तांत्रिक कारणास्तव अनुप मोरे उपस्थित राहू शकले नाहीत.”

तरीही, मैदानात “अनुप मोरे! अनुप मोरे!!” अशा घोषणांनी वातावरण दणाणून गेले. कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास आणि नेतृत्वावरचा अढळ विश्वास यामुळेच उपस्थितीपेक्षा “विश्वासच ताकदीचा पुरावा” ठरला.

विश्वास, निष्ठा आणि एकतेचा संगम

कार्यक्रमात प्रभागातील सर्व इच्छुक उमेदवारांना एकाच व्यासपीठावर आणून एक वेगळाच आदर्श उभा केला गेला. “अनुप मोरे देतील ते उमेदवार आम्हाला मान्य राहतील,” अशी भूमिका इच्छुक उमेदवारांनी जाहीरपणे मांडली.

विरोधक आणि माध्यम प्रतिनिधींसह संपूर्ण पिंपरी-चिंचवडचे लक्ष या मेळाव्याकडे लागले होते. चार दिवसांत राजकारणात अनेक घडामोडी झाल्या, तरीही प्रभाग १५ ने दाखवून दिले —

 “जहां भरोसा होता है, वहां मौजूदगी की जरूरत नहीं होती!”

*पक्षनेते, कार्यकर्त्यांची एकजूट आणि जोश*
भर पावसातही उसळलेल्या गर्दीत कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता हा फक्त प्रभागाचा नव्हे, तर “शहराचा मेळावा” ठरल्याची भावना सर्वांनी व्यक्त केली.

कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती:

आमदार उमा खापरे

आमदार अमित गोरखे

शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे

प्रदेश कार्यकारिणी सदस्य सदाशिव खाडे

माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके

माजी उपमहापौर शैलजाताई मोरे

माजी नगरसेविका शर्मिला बाबर

महामंत्री मधुकर बच्चे

मंडल अध्यक्ष जयदीप खापरे

भाजपा सचिव राजेंद्र बाबर

माजी महापौर आर. एस. कुमार,
तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.

नेत्यांचे उद्गार

आमदार उमा खापरे म्हणाल्या –
“विरोधकांनी भाजपला कमी लेखू नये. भाजप हा एकसंघ पक्ष आहे. ‘सबका साथ, सबका विकास’ हेच आमचं ब्रीद असून प्रभाग १५ मधील सर्व जागा आम्ही जिंकणार आहोत.”

शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे म्हणाले –
“हा मेळावा फक्त प्रभागाचा नाही, तर संपूर्ण शहराचा आहे. अनुप मोरे यांनी पक्षाची प्रतिमा जपली आहे — त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहा.”

आमदार अमित गोरखे म्हणाले –
“पावसातही कार्यकर्त्यांची उपस्थिती हीच भाजपची खरी ताकद आहे.”

माजी उपमहापौर शैलजाताई मोरे म्हणाल्या –
“२४x७ पाणी योजना, सांडपाणी प्रकल्प, मेट्रो आणि उद्यान विकास — हे सर्व काम भाजपच्या पुढाकारानेच साकार झाले आहेत.”

अनुपस्थितीतही ठसा उमटवणारे नेतृत्व
अनुप मोरे यांच्या अनुपस्थितीतही कार्यकर्त्यांचा विश्वास, एकजूट आणि निष्ठा या साऱ्यांनीच प्रभाग १५ मध्ये त्यांचे नेतृत्व पुन्हा अधोरेखित केले.
राजकारणात उपस्थितीपेक्षा विश्वासाचं महत्त्व किती मोठं असतं, हे या मेळाव्याने सिद्ध करून दाखवले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

eleven + eighteen =