किवळे-रावेत,दि.२४ जुन २०२५(प्रजेचा विकास न्यूज प्रतिनिधी):- पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC) नागरिकांसाठी अनेक सेवा आणि सुविधा पुरवते. यात मालमत्ता कर भरणा, विविध दाखले मिळवणे, आरोग्य सेवा, शिक्षण, स्वच्छता आणि इतर नागरी सुविधांचा समावेश आहे. PCMC नागरिकांच्या सोयीसाठी सतत प्रयत्नशील असते.
महापालिका प्रशासन (Municipal Administration) का मतलब शहर किंवा गावाच्या स्थानिक स्वराज्य संस्थेची व्यवस्था म्हणजे शहराचा विकास, पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण आणि इतर नागरी सेवांचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी या संस्थेवर आहे .
१३ मार्च २०२५ला पिंपरी चिंचवड महापालिकेची मुदत संपली. तेव्हापासून म्हणजे साडे तीन वर्षापासून शहरात प्रशासकीय राजवट सुरु आहे. प्रथमच एवढ्या मोठ्या कालावधीपर्यंत ती सुरु राहिली आहे. भविष्यातही कधी महापालिका निवडणूक होईल,की नाही, हे निश्चीत नाही.माञ सूप्रीम कोर्टाने चार महिन्यात निवेडणुका घेण्याचे आदेश दिल्याने ऑक्टोंबर-नोव्हेंबर महिन्यात निवडणुका होतील. असे संकेत दिसत असल्याने सर्व महापालिका निवडणुक लढवणाऱ्यांच्या भुया उंचावल्या आहेत व दिखाव पणाने समाजकार्याच्या मागे लागले आहेत.
दुसरीकडे पदाधिकारी यांचा महापालिकेचा कारभार बेशिस्त आणि भोंगळ झाला आहे. नागरिकांनी केलेल्या तक्रारी सोडवण्याआधी निवडणूक लढवणारे भावी उमेदवार व माजी नगरसेवक यांना प्रथम प्राधान्य दिले जाते. जणू महापालिका प्रशासन या सर्व निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांचे प्रोफाइल तयार करण्यासाठी फोटो बाजीसाठी काम करत आहे. काय? असा प्रश्न जनतेला पडत आहे. अनेक नागरिकांकडून वेगवेगळ्या माध्यमातून सारथी वरून महापालिका प्रशासनाकडे अडीअडचणीच्या तक्रारी केल्या जात आहे. मात्र त्या सोडवल्या जात नाहीत तर काही तक्रारी परस्पर सारथी वर मिटवल्या जात आहेत. ज्या तक्रारी मिटवल्या जात आहेत. त्या तक्रारीसाठी नागरिक मात्र पाठपुरावा करताना खचून जात आहेत.
त्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे बघण्याचा दृष्टिकोन देखील, त्यांचा बदलत आहे. महापालिका आयुक्त शेखर सिंग यांनी महापालिकेचा पदभार स्वीकारल्यानंतर, महापालिकेच्या भागात प्रशासनामध्ये आलेली मरगळ उडवत काही, अधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखवत महापालिकेच्या कामकाजामध्ये बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.
मात्र आयुक्तांच्या आदेशांना किंवा आयुक्तांच्या चाललेल्या कारभाराला महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून केराची टोपली दाखवली जात आहे, का? पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला प्रशासन कार्यकाळ चालू झाल्यापासून प्रशासनाच्या माध्यमातून अनेक तक्रारी सोडवल्या जाव्यात प्रशासनाच्या माध्यमातून नागरिकांच्या तक्रारी जाणून घेतल्या जाव्यात, यासाठी जनसंवाद सभेचे देखील आयोजन करण्यात आले. मात्र महापालिकेच्या जनसंवाद सभेकडे देखील नागरिक पाठ फिरवताना दिसत आहे. तुरळक प्रमाणात काही भावी उमेदवार निवडणूक लढवण्यासाठी पाठपुरावा करताना दिसत आहेत. तर काही स्वतःच्या प्रसिद्धीसाठी काम करताना दिसत आहेत तर काही कॅन्टोन्मेंट हद्दीत असणारे कार्यकर्ते महानगरपालिकेच्या कारभारात येऊन प्रसिद्धी मिळवताना दिसत आहेत. मात्र अनेक वर्षापासून आंदोलन उपोषण करणारे कार्यकर्ते व कोरोना काळापासून नागरिकांच्या सेवेत असणारे कार्यकर्ते अशा कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचा वातावरण निर्माण झाला आहे.महापालिका प्रशासन या सर्व भावी उमेदवारांना फोटोसेशन साठी व त्यांच्या प्रसिद्धीसाठी काम करत आहे. की नागरिकांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी नागरिकांच्या सेवेसाठी काम करत आहे. असे अनेक प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण होत असल्याने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ब प्रभागावरती अनेक प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकाम,अनेक ठिकाणी रेड झोनचा प्रश्न अनेक ठिकाणी कचऱ्याचा प्रश्न अनेक ठिकाणी पावसाळ्यापूर्वी रस्ते गटारी ड्रेनेज नाले यांच्या साफसफाईकडे दुर्लक्ष तर काही ठिकाणी फक्त फोटोसेशन साठी ठराविक लोकांनी बोलवले किती चेहरे पाहून काम करण्याची लागलेली सवय अशा अनेक प्रश्नांनी ब प्रभाग चिंताग्रस्त आहे गेले कित्येक वर्षापासून किवळे रावेत विकास नगर मामुर्डी हे महानगरपालिकेत समाविष्ट झाल्यापासून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रशासनाकडून दुर्लक्षित भाग असल्यासारखे प्रभाग क्रमांक १६ कडे पाहिले जात आहे त्यामुळे प्रभाग क्रमांक १६ मध्ये अनेक सुविधांचा अभाव व अनेक विकास कामे रखडल्याचे दिसत आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सर्व कर्मचारी व प्रभाग क्षत्रिय कार्यालय व त्यांचे सर्व कर्मचारी नागरिकांच्या सेवेसाठी नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर राहतील का फक्त स्वतःच्या प्रसिद्धीसाठी पुढे पुढे पळणाऱ्या स्वयंघोषित नेत्यांच्या सेवेसाठी राहतील याचा परिणाम मात्र निवडणुकीवर पडू नये मतदानाकडे नागरिकांनी पाठ फिरवू नये त्यामुळे सर्व नागरिकांचे लक्ष महापालिका प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांकडे ठेकेदारांकडे लागले आहे.





