देहूरोड,दि.१७ डिसेंबर २०२५(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-देहूरोड येथील साउथ इंडियन असोसिएशनच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या सेठ एच. ए. बारलोटा मेमोरियल विजडम इंग्लिश मीडियम हायस्कूल, विकास नगर, किवळे येथे शाळेचा २९ वा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा भव्य स्वरूपात साजरा करण्यात येणार आहे.
या स्नेहसंमेलनाचा पहिला दिवस (पूर्व प्राथमिक ते इयत्ता पहिली)शुक्रवार, १९ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता, शाळेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे.
यंदाच्या वार्षिक दिन सोहळ्याची संकल्पना “RHYTHM OF EXPRESSION – रंग, संस्कृती आणि सर्जनशीलतेचा उत्सव” अशी असून, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ देणारे विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहेत.
या कार्यक्रमासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे माजी महापौर मा. श्री. आर. एस. कुमार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच बालरोग व बाल अंतःस्रावशास्त्र तज्ज्ञ मा. डॉ. मधुरा करगुपीकर (एम.डी. पेडियाट्रिक, पीडीसीसी – पेडियाट्रिक एंडोक्रायनोलॉजी) या सन्माननीय अतिथी म्हणून कार्यक्रमाची शोभा वाढवणार आहेत.
शाळेतील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक व सहशैक्षणिक क्षेत्रात मिळवलेल्या यशाचा गौरव या सोहळ्यात करण्यात येणार असून, पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या संयुक्त प्रयत्नांचे हे प्रतीक ठरणार आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन चेअरमन श्री. जयशंकर जयसिंग, सचिव सौ. पार्वती बाबू, कोषाध्यक्ष श्री. जेकब जी. नादर, तसेच मुख्याध्यापिका सौ. गायत्री धामणेकरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.
शाळा व्यवस्थापन, शिक्षकवृंद, पीटीए सदस्य आणि विद्यार्थी यांच्या वतीने नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.





