गावडे बंगल्यावरील दरोडा की राजकीय खेळ?
पिंपरी, दि.३१ ऑक्टोबर २०२५(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- माजी नगरसेविका जयश्री गावडे यांच्या बंगल्यावर झालेला दरोडा हा केवळ गुन्हा राहिला नाही, तर राजकीय ‘नाटक’ बनल्याचं चित्र दिसत आहे.
दहा-बारा जणांनी घरात घुसून मारहाण, तोडफोड आणि तब्बल १ कोटी १३ लाखांचा ऐवज लुटल्याची तक्रार नोंदवली गेली. पण चौकशीच्या चार दिवसांत तपासाचं लक्ष्य अचानक वळलं — गावडे बंगल्यावरून थेट भाजयुमो प्रदेशाध्यक्ष अनूप मोरे यांच्या दिशेने.
शहरात आता सर्रास चर्चा सुरू आहे —
“दरोड्याचा विषय गौण करून मोरे यांचं नाव पुढे करून कुणी तरी दुसरं अजेंडा साधतंय का?”
“घटनेचं लक्ष्य बदललं गेलं” — गावडे यांचा आरोप
माजी नगरसेविका जयश्री गावडे यांनी सांगितले की, “घटनेच्या दिवशी तेजस्विनी कदम ही घटनास्थळी आली आणि घरातील सीसीटीव्हीचा डिव्हीआर घेऊन गेली. पुरावे नष्ट करण्यामागे तिचं उद्दिष्ट काय होतं, हे पोलिस तपासत नाहीत. त्याऐवजी तपास दुसऱ्याच दिशेने वळवला गेला आहे.”
त्यांच्या म्हणण्यानुसार, काहींनी मुद्दाम “मोठ्या नावांचा” उल्लेख करून प्रकरणाचं लक्ष दुसरीकडे नेण्याचा प्रयत्न केला.
गावडे यांचा आरोप आहे की, “कदम हिला खऱ्या दरोड्याचा तपास टाळायचा होता. तिच्या मागे कोणाचं संरक्षण आहे, हे शहरात सगळ्यांना ठाऊक आहे.”
तेजस्विनी कदम : सावलीतला रोल?
घटनेनंतर तेजस्विनी कदम हिचं नाव पुढे आलं, पण तिच्यावर कारवाई झाली नाही.
यावरून नागरिकांत प्रश्न उपस्थित झाला आहे — “ती आली होती दरोडा टाकायला की राजकीय समीकरणं ठरवायला?”
कारण सीसीटीव्हीचा डिव्हीआर नेणं म्हणजे पुरावे मिटवणं नव्हे, तर कथानकाचा फोकस बदलणं — अशी शहरभर चर्चा आहे.
जर अनुप मोरे खरच टार्गेट होते,तर गावडे प्रकरणातच का? इतर ठिकाणी का नाही केल हा प्रश्न संभ्रमात टाकणारा आहे.
“माझं नाव मुद्दाम ओढलं जातंय” — अनूप मोरे
दरम्यान, भाजयुमो प्रदेशाध्यक्ष अनूप मोरे यांनीही यावर तीव्र प्रतिक्रिया दिली.
त्यांनी सांगितले की, “मी घटनास्थळी होतो, पण पोलिसांच्या उपस्थितीत. माझा या प्रकरणाशी काडीमात्र संबंध नाही. तरीही काहींच्या सूचनेवरून माझं नाव पुढे केलं जातंय. हे लक्ष दुसरीकडे वळवण्याचं कारस्थान आहे.”
गर्दी ठिकाणी माझ्या नावाने आरडा ओरडा केला म्हणजे माझी बदनामी करणे,लोकांन मध्ये चर्चा घडवणे या पलिकडे काही नाही हे सर्व जनता जाणते,काहीना राजकीय मुद्दा नाही मग असे उद्योग असतात.
मोरे पुढे म्हणाले, “मूळ विषय आहे — माजी नगरसेविकेच्या घरावरचा दरोडा. पण तो विषय झाकण्यासाठी काहीजण दुसऱ्यांवर सावली टाकत आहेत.”
पोलिसांचा तपास की राजकीय दिशा?
घटनेला चार दिवस झाले तरी मुख्य आरोपी फरार आहेत. शहरात विचारलं जातंय —
“पोलिस तपास करतातय की स्क्रिप्ट?”
पोलिसांकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया नाही, पण नागरिकांमध्ये असा सूर उमटतो आहे की, “तपास गेला कुठं, आणि अजेंडा वळला कुठं!”
पोलिसांवर संशयाची सुई वळली जात आहे.
या संपूर्ण प्रकरणात एक गोष्ट स्पष्ट दिसते —
गावडे बंगल्याचा दरोडा झाला, पण राजकारणाचा “खेळ” दुसरीकडे खेळला गेला.
तेजस्विनी कदम यांची भूमिका अद्याप गूढ आहे, तर अनूप मोरे हे अचानक या राजकीय रणभूमीवर ओढले गेले.त्यामुळे एखाद्याचे राजकीय करिअर डॅमेज करण्याचे षडयंञ दिसत आहे.पक्षात राहुनच पक्षातील नेत्यांच्या विरोधात सुपारी घेतल्या सारखा प्रकार तर नाही ना? भाजपातील वरीष्ट नेते या प्रकरणात लक्ष देतील का? की विरोधकांना राजकीय खेळी खेळुन पक्षातील शुन्यातुन विश्व निर्माण करणार्या कार्यकर्त्याला साथ देतील या कडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
प्रश्न फक्त एवढाच —
“दरोडा कोण टाकला, आणि तपास कोण चालवतोय?” का ब्लॅकमेलिंग चा प्रकार किंवा पोलिंसाची दिशा भरकटवण्याचा प्रयन्त अनेक प्रश्न निर्माण होतात.माञ पोलिस प्रशासनावर व अनुप मोरे ना अटकवण्याचे प्रकरणात पोलिसांची भुमिका संशयास्पद वाटते.माञ ह्या प्रकरणात वेगळच काही दडलय याचा संबध स्थानिक निवडणुका व राजकीय करिअर डॅमेज असाच काही दिसत आहे.त्यामुळे संपुर्ण महाराष्र्टात यावर चर्चा रंगत आहे,तर विरोधी पक्ष देखील याचा फायदा घेत सोशल पोस्ट करताना दिसत आहेत.



