निगडी,दि.०१ सप्टेंबर २०२५( प्रजेचा विकास न्यूज प्रतिनिधी):-पिंपरी-चिंचवडमधील पुनावळे परिसरात दलित विधवा महिलेसह संपूर्ण कुटुंबावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात आजपासून ‘महा विकास समिती’ या सामाजिक संघटनेने अप्पर तहसीलदार कार्यालय, निगडी येथे आमरण उपोषण सुरू केले आहे.
पीडित महिला श्रीमती मंगला रघुनाथ साबळे (विधवा) या त्यांच्या सून आणि अल्पवयीन नातवांसह सन 1996 पासून सर्वे नं. 12, पुनावळे येथे कायदेशीरपणे वास्तव्य करत आहेत. मात्र, स्थानिक बिल्डर श्री. एन. बी. भोंडवे यांनी त्या कुटुंबाला घातपाती पद्धतीने त्रास देत गंभीर अन्याय केला असल्याचे आरोप महा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष रेव्ह. डॉ. सोलोमनराज डेव्हिड भंडारे यांनी केले आहेत.
अन्यायाची गंभीर प्रकरणे पुढे आली:
पीडितांचे घर पाडले गेले
रस्ता बेकायदेशीररित्या बंद केला गेला
शौचालय तोडण्यात आले
झाडांची बेकायदेशीर तोड
दलित म्हणून जातीवाचक अपमान
घराजवळ खड्डा खोदून धोका निर्माण
या सर्व प्रकारांची तक्रार संबंधित पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे, व्हिडिओ व दस्तऐवजी पुरावेही सादर करण्यात आले आहेत.
महा विकास समितीच्या प्रमुख मागण्या:
1. बेकायदेशीर बंद केलेला रस्ता तात्काळ खुला करावा
2. शौचालयाची तात्पुरती व्यवस्था उपलब्ध करून द्यावी
3. पीडित कुटुंबाला पोलिस सुरक्षा द्यावी
4. धोकादायक खड्डा तात्काळ बुजवावा
5. बेकायदेशीर झाडतोडीबद्दल FIR दाखल करावी
6. जातीवाचक अपमानप्रकरणी SC/ST अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवावा
7. PCMC अधिकाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केले असल्याने त्यांच्यावर कारवाई करावी
उपोषण मागे घेणार नाही – महा विकास समितीचा इशारा
रेव्ह. डॉ. भंडारे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “जोपर्यंत पीडित विधवा दलित कुटुंबाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत महा विकास समिती आमरण उपोषण मागे घेणार नाही.”





