Home ताज्या बातम्या भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी केली १२६ पदाधिकाऱ्यांच्या ‘जम्बो’ कार्यकारिणीची घोषणा

भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी केली १२६ पदाधिकाऱ्यांच्या ‘जम्बो’ कार्यकारिणीची घोषणा

0

पिंपरी-चिंचवड,दि.२८ ऑगस्ट २०२५ (प्रजेचा विकास न्यूज प्रतिनिधी):- बहुप्रतीक्षित भारतीय जनता पार्टी (भाजप) पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा कार्यकारिणी अखेर जाहीर झाली आहे. गणेशोत्सवाच्या शुभमुहूर्तावर शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांनी तब्बल १२६ पदाधिकाऱ्यांची “जम्बो” कार्यकारिणी जाहीर केली. यात ४ सरचिटणीस, ८ उपाध्यक्ष, ८ सचिवांसह विविध प्रकोष्ठ व आघाडीचे पदाधिकारी समाविष्ट असून, पक्षाच्या सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केल्याचे काटे यांनी स्पष्ट केले.

शहराध्यक्ष काटे यांनी कार्यकारिणी निश्चित करण्यापूर्वी ३०० हून अधिक कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेतल्या. तसेच स्थानिक नेत्यांशी चर्चा करून प्रत्येक कार्यकर्त्याची क्षमता व पक्षासाठीचे योगदान लक्षात घेऊन ही कार्यकारिणी तयार करण्यात आली. या प्रक्रियेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, संघटन मंत्री मकरंद देशपांडे यांचे मार्गदर्शन मिळाले. तसेच आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप, आमदार अमित गोरखे, आमदार उमा खापरे, माजी खासदार अमर साबळे व माजी आमदार अश्विनी जगताप यांचे सहकार्यही लाभले.

“ज्या कार्यकर्त्यांना या वेळी संधी मिळाली नाही, त्यांना भविष्यात नक्कीच योग्य संधी दिली जाईल,” असे आश्वासन काटे यांनी दिले.

कार्यकारिणीतील प्रमुख पदाधिकारी :

सरचिटणीस: ॲड. मोरेश्वर शेडगे, विकास डोळस, मधुकर बच्चे, वैशाली खाडये

वरिष्ठ उपाध्यक्ष: काळूराम बारणे

उपाध्यक्ष: ॲड. विनायक गायकवाड, तुषार हिंगे, राम वाकडकर, अमित पसरणीकर, रमेश वाहिले, अजित भालेराव, विनोद मालू

सचिव: नवनाथ ढवळे, राजेंद्र बाबर, खंडूदेव कथोरे, दीपक भोंडवे, ॲड. युवराज लांडे, मंगेश कुलकर्णी, गिरीश देशमुख, अभिजीत बोरसे

कोषाध्यक्ष: हेमचंद्र मासुळकर

कार्यालय प्रमुख: संजय परळीकर

विविध मोर्चे व आघाड्यांचे प्रमुख :

युवा मोर्चा अध्यक्ष: दिनेश यादव

महिला मोर्चा अध्यक्ष: सुजाता पालांडे

अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष: अनिल (बापू) घोलप

ओबीसी मोर्चा अध्यक्ष: चेतन भुजबळ

व्यापारी आघाडी अध्यक्ष: राजेंद्र चिंचवडे

कायदा आघाडी अध्यक्ष: ॲड. गोरख कुंभार

सोशल मीडिया सेल: सागर बिरारी

ट्रान्सपोर्ट सेल अध्यक्ष: सुनील लांडगे

सांस्कृतिक सेल अध्यक्ष: विजय भिसे

ज्येष्ठ कार्यकर्ता सेल अध्यक्ष: विजय शिनकर

माजी सैनिक सेल अध्यक्ष: देविदास साबळे

आध्यात्मिक प्रकोष्ठ अध्यक्ष: जयंत बागल

आयुष्मान भारत सेल अध्यक्ष: गोपाळ माळेकर

बेटी बचाव बेटी पढाव अध्यक्ष: प्रीती कामतीकर

अभियंता सेल अध्यक्ष: संतोष भालेराव

चार्टर्ड अकाउंट सेल अध्यक्ष: बबन डांगले

दिव्यांग सेल अध्यक्ष: अंकुश शिर्के

वैद्यकीय प्रकोष्ठ अध्यक्ष: डॉ. अमित नेमाने

गृहनिर्माण संस्था फेडरेशन प्रकोष्ठ: प्रदीप बेंद्रे

वकृत्व प्रशिक्षण प्रकोष्ठ: हरीश मोरे

मन की बात संयोजक: नंदकुमार दाभाडे
👉 ही नवी कार्यकारिणी जाहीर झाल्याने शहरातील भाजप कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण असून आगामी निवडणुकांच्या दृष्टीने पक्ष संघटनेला नवी ऊर्जा मिळाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

one × two =