Home ताज्या बातम्या राजकीय नेत्यांच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळुन आधिकारी पोमण यांचा राजीनामा तर यश सानेची कारवाहीची...

राजकीय नेत्यांच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळुन आधिकारी पोमण यांचा राजीनामा तर यश सानेची कारवाहीची मागणी

0

पिंपरी,दि.११ मे २०२१(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे मुख्य संगणक अधिकारी तथा स्मार्ट सिटीचे कंपनीचे सह मुख्य कार्यकारी आधिकारी श्री निळकंठ पोमण यांनी माहापालीकेतील काही राजकीय नेत्यांच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळुन आपल्या पदाचा राजीनामा पालिकेचे आयुक्त राजेशे पाटील यांच्याकडे दिला आहे,निळकंठ पोमण यांना ब्लॅकमेल करणारा कोणीही असो,कोणत्याही पक्षाचा नेता किंवा कार्यकर्ते असो सत्ताधारी किंवा विरोधी संबधीतांविरोधी फौजदारी गुन्हा दाखल करुन त्या वर उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी पञा द्वारे दिवंगत नगरसेवक दत्ताकाका साने यांचे चिरंजीव यश दत्ताकाका साने(शहरध्यक्ष-राष्र्टवादी विद्यार्थी काॅग्रेस पि.चि शहर जिल्हा) यांनी केली आहे.अधिकार्‍यांना ब्लॅकमेलिंग करुन खंडणी वसुल करायची पंरपंरा काही लोकांनी सुरु केली आहे.या ब्लॅकमेलिंगमूळे एखाद्या अधिकार्‍यांचा जीव जाऊ शकतो.एखादा अधिकारी आत्महत्या करु शकतो.त्यामुळे पुढे कोणीही अधिकार्‍यांना ब्लॅकमेल करु नये या साठी ठोस पाऊले उचलुन राजकीय पुढार्‍यांना शिस्तही लागेल आणि आयुक्तांनी ब्लॅकमेलर वर कारवाही करुन चांगल्या अधिकार्‍यांना न्याय द्यावा.असे पञ म्हटले असुन पञ मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

three + nine =

error: Content is protected !!
Exit mobile version