Home ताज्या बातम्या ‘कोरोनारूपी रावणाचा नाश करू – डाॅ.भारती चव्हाण यांच्याकडून सर्वाना दसऱ्याच्या शुभेच्छा

‘कोरोनारूपी रावणाचा नाश करू – डाॅ.भारती चव्हाण यांच्याकडून सर्वाना दसऱ्याच्या शुभेच्छा

0

पिंपरी-चिंचवड,दि.25 आॅक्टोबर 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- गुणवंत कामगार संघटना चे व अॅन्टी कोरोना टास्क फोर्स च्या राष्र्टीय अध्यक्षा तसेच मानिनी फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा डाॅ.भारती चव्हाण यांनी सर्वांना दसर्‍याच्या शुभेच्छा दिल्या
विजयादशमी म्हणजे संकटावर, वाईट प्रवृत्तीवर विजय मिळवण्याची प्रेरणा दिवस होय यंदाच्या या विजयादशमी म्हणजेच दसऱ्याच्या उत्सवातून कोरोनावर विजय मिळवण्याचा दिवस प्रेरणा घेऊन आपण एकञीत पणे कोरोना विषाणूरूपी रावणाचा नाश करू या.कोरोना संकटावर मात करून महाराष्ट्र नव्या जोमाने भरभराट आणि समृद्धीकडे वाटचाल करेल, असा विश्वासही डाॅ.भारती चव्हाण यांनी व्यक्त करत दसरा विजयदशमी च्या शुभेच्छा दिल्या आहे.कोविड योद्धे लढवय्या महाराष्ट्र अशी आपली ओळख निर्माण करत. आपण अनेकदा संकटांचा यशस्वी मुकाबला केला आहे. त्यामुळे कोरोना विषाणुच्या विरोधातील लढ्यातही आपण सर्व भेद बाजुला ठेवून एकवटले आहोत. कोरोनाच्या संकटातच निसर्गाची अवकृपा झाली. पण या सगळ्या संकटांना न डगडगमता सामोरे जात आहोत. कोरोनाच्या विषाणूला पराजीत करण्यासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या शासकीय मोहीम राबवत आहे त्यात सहभागी होत घराघरापर्यंत पोहचून विषाणुचाच पाठलाग करून, त्याला रोखण्याचा आपले अॅन्टी कोरोना टास्कचे कोरोना योद्धा प्रय़त्न करत आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी सगळ्यांनीच खूप संयम दाखवला आहे. सर्वच धर्मींयानी आपले सण, उत्सव घरीच साजरे केले आहेत. उद्या विजयादशमी अर्थात दसऱ्याचा उत्सव साजरा करणार आहोत. दसरा संकटावर, वाईट प्रवृत्तीवर मात करण्यासाठी आज संकलाप करुयात त्यामुळे आपल्याला दसरा उत्साहात साजरा करतानाच विषाणुच्या समूळ उच्चाटनासाठी आरोग्य दक्षतेचे गर्दी न करण्याचे – शारिरीक अंतर राखण्याचे, मास्क वापरण्याचे, वारंवार हात धुण्याच्या सूचनेचे पालन करावे लागेल. अशा प्रय़त्नातूनच आपण कोरोनारुपी रावणाचा नाश करू आणि नव्या जोमाने भरभराटीकडे आणि समृद्धीकडे वाटचाल करूया असे डाॅ.भारती चव्हाण यांनी सांगितले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

14 − eight =

error: Content is protected !!
Exit mobile version