Home ताज्या बातम्या बौद्धिक संपत्तीविषयी जनजागृती होण्याची गरज आहे- चेतन गुंदेचा.

बौद्धिक संपत्तीविषयी जनजागृती होण्याची गरज आहे- चेतन गुंदेचा.

0

बौद्धिक संपत्तीविषयी जनजागृती होण्याची गरज आहे- चेतन गुंदेचा.

यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या आयआयएमएस च्यावतीने

 ‘ बौद्धिक संपत्ती’ विषयावरील वेबिनार संपन्न.

पिंपरी,दि. 22 जुलै 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- बौद्धिक संपत्ती विषयी समाजात  मोठ्या प्रमाणात जनजागृती होण्याची गरज आहे असे मत या क्षेत्रातील तज्ञ् चेतन गुंदेचा यांनी व्यक्त केले. चिंचवड येथील  यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या  इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस)च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘बौद्धिक संपत्ती’ विषयावरील वेबिनारमध्ये ते बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी  पेंटट ही संकल्पना, पेटंटची गरज, त्याचे फायदे, कशा कशाचे पेंटट  होऊ शकते, पेंटट कायदे  व आंतरराष्ट्रीय पेटंट धोरण याविषयी  सविस्तर माहिती सांगितली.

तसेच ट्रेड मार्क, कॉपीराईट, डिझाईन्स  आणि भौगोलिक नकाशे या बौद्धिक संपत्ती अंतर्गत येणाऱ्या बाबींबद्दलही  चेतन गुंदेचा यांनी सविस्तर माहिती सांगितली. या वेबिनारचे प्रास्ताविक  आयआयएमएसचे  संचालक डॉ.शिवाजी मुंढे  यांनी  केले.तर आभार प्रदर्शन डॉ. पुष्पराज  वाघ  यांनी केले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

four × five =

error: Content is protected !!
Exit mobile version