Home ताज्या बातम्या फेसबुकवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याला महिला आघाडीने दाखवला हिसका

फेसबुकवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याला महिला आघाडीने दाखवला हिसका

0

बीड,दि.30 डिसेंबर 2019(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-
शिवसेनेच्या फेसबुक पेजवर शिवसेना पक्षप्रमुख व उद्धव ठाकरे यांच्याबाबत खालच्या पातळीवर जाऊन आक्षेपार्ह पोस्ट टाकणे एका शासकीय अधिकाऱ्याला चांगलेच महागात पडले आहे. या अधिकाऱ्याला शिवसेनेच्या रणरागिणींनी चांगलाच हिसका दाखवला.बीड पंचायत समितीतील विस्तार अधिकारी सुनील कुलकर्णी यांनी फेसबुकवर मुख्यमंत्र्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केले होते. त्यांच्या त्या कमेंटचा निषेध करण्यासाठी शिवसेनेच्या महिला आघाडीने त्यांच्या अंगावर भर कार्यालयात शाई फेकत त्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा प्रयत्न झाला आहे.
हा सगळा प्रकार बीड पंचायत समितीच्या कार्यालयात सोमवारी दुपारी बारा वाजता घडला. या प्रकारची जिल्ह्यात चर्चा सुरू आहे. शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख अॅड. संगिता चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली रणरागिणींनी कुलकर्णी यांना धडा शिकवला.तसेच इथून पुढे ठाकरे सरकार बद्दल अपशब्द काढला तर याद राख असा सज्जड दम देखील दिला. बीड पंचायत समितीच्या आवरत झालेल्या या प्रकाराची जिल्ह्यात चर्चा सुरू आहे. सोमवारी सभापती निवडीसाठी लोकांची गर्दी होती. यातच हा सगळा प्रकार घडल्याने बघ्यांनी गर्दी केली होती.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

11 + 17 =

error: Content is protected !!
Exit mobile version