Home ताज्या बातम्या देहुरोड येथील अनाथ आश्रमातील अनाथ असलेल्या २महिन्याच्या मुलीला मिळाले नाव आणि आधार,

देहुरोड येथील अनाथ आश्रमातील अनाथ असलेल्या २महिन्याच्या मुलीला मिळाले नाव आणि आधार,

0

देहुरोड:(दि.८जुलै२०१९,प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-
भीम आर्मी देहुरोड शहर अध्यक्ष अक्षय वाघमारे यांनी स्वतःचा वाढदिवसाचा खर्च टाळुन, देहूरोड येथील संतुष्टी बाल विकास आणि स्त्री आधार सेवा केंद्र या अनाथलायत अनाथ मुला सोबत केक कापुन,जेवण करुन(अन्नदान), सहपरिवार साजरा केला वाढदिवस व त्याच अनाथलयातील २ महिन्याच्या अनाथ मुलीचा सर्व लग्नापर्यंतच्या संगोपनाच्या खर्चाची जबाबदारी स्वीकारली, अनाथ मुलीचे चिमुकलीचे नामकरण अनन्या असे केले,व आज अक्षय वाघमारे यांना जीवनातील खर सुख आणि आनंद वाटुन घेतल्या सारखे वाटले,व असा प्रत्येकांनी संकल्प करावा बुद्धांनी सांगितलेली दान पारिमिता,मैञी करुणा प्रज्ञा या गोष्टी आचरणात आणल्या की सुखाच्या दिशेने वाटचाल होते असे या वेळी बोलतांना भीम अर्मी शहर अध्यक्ष अक्षय वाघमारे यांनी सांगितले या प्रसंगी नाथलयातील संचालिका रिना कदम व सुनील शेळके युवा मंच चे अतुल मराठे, शिवसेनेचे जस्विदर बीडलान, संदीप बालघरे, विकी जाधव, अनिकेत वाघमारे, रमेश पवार, आदी कार्यकर्ते पदाधिकारी व कुटुंबातील नातेवाईक उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

six + eight =