Home ताज्या बातम्या वादग्रस्त विधान केले सोलापूर भाजपचे उमेदवार डॉ. जय सिद्धेश्वर यांनी ‘बोलणारा देव...

वादग्रस्त विधान केले सोलापूर भाजपचे उमेदवार डॉ. जय सिद्धेश्वर यांनी ‘बोलणारा देव मी आहे’

0

सोलापुर(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-भाजपच्या नेत्यांनी मोदींना विष्णूचा आवतार म्हटले होते. आता सोलापूरचे भाजपचे उमेदवार डॉ. जय सिद्धेश्वर यांनी ‘बोलणारा देव मी आहे’ असे वादग्रस्त विधान केले आहे. त्यामुळे आता भाजप देवांचा पक्ष झाला की काय असा प्रश्न पडला तर नवल वाटायला नको. डॉ. जय सिद्धेश्वर यांनी प्रचारादरम्यान हे वादग्रस्त विधान केले आहे.
‘देवाला जरी गेला तरी सुद्धा तुम्हाला पुण्य मिळणार नाही. देव दर्शनासाठी तुम्ही गेलात तरी देव तिथे तुम्हाला भेटणार नाही. जरी भेटला तर तो बोलू शकणार नाही. बोललाच तर आलास त्या पावली परत जा म्हणेल. तुमचे पैसे खर्च होतील पण तुम्हाला समाधान मिळणार नाही. कोठेही जावा, तुळजापूरला जावा, पंढरपूरला जावा मात्र तुम्हाला देव भेटणार नाही, बोलणारही नाही. बोलणारा देव मी आहे’, असे वादग्रस्त विधान जय सिद्धेश्वर यांनी केले आहे.
भाजपाने सोलापूर लोकसभा मतदारसंघात यावेळेस पक्षाचे विद्यमान खासदार अ‍ॅड. शरद बनसोडे यांचे तिकीट कापून गौडगावचे (ता. अक्कलकोट) डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांना उमेदवारी दिली आहे. शिवाचार्य हे प्रथमच निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यातच वंचीत बहुजन आघाडी(भारिप बहुजन महासंघाचे )अध्यक्ष अॅड.प्रकाश आंबेडकर व काॅग्रेंस मधुन सुशिलकुमार शिंदे ही सोलापूरमधून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे या ठिकाणी तिरंगी लढत पहायला मिळणार आहे. डॉ. जयसिद्धेश्वर यांनी केलेल्या या वादग्रस्त विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. दैववादाला तोंड फोडुन आंबेडकरवादी विचारसरीणीच्या विरोधातील हि लढाई दिसत आहे,त्यामुळे भाजप पक्ष हा देवांचा पक्ष आहे का?की अलीकडे भाजप नेते म्हणत आहेत मोदी चमत्कार करतील,आता मतदाना दिवशी जनता मतदारच जो मतदानाच्या स्वरुपात चमत्कार दाखवून कुणाला निवडुन देतील या कडे सर्व महाराष्र्टाचे लक्ष लागले आहे.खाली व्हिडोओ पहा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

6 − 1 =