पिंपरी चिंचवड,दि.१४ नोव्हेंबर २०२५( प्रजेचा विकास न्यूज प्रतिनिधी):-पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाने शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर लगाम घालण्यासाठी ऑक्टोबर महिन्यात मोठी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. परिमंडळ २ अंतर्गत विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीतील विशाल उर्फ साकी गायकवाड सह १६ सराईत व रेकॉर्डवरील गुन्हेगारांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५६ नुसार हद्दपार करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे, पोलीस सह आयुक्त श्री. शशिकांत महावरकर आणि अपर पोलीस आयुक्त श्री. सारंग आवाड यांच्या आदेशानुसार करण्यात आल्याची माहिती पोलीस उप-आयुक्त विशाल गायकवाड (परिमंडळ २) यांनी दिली.
हद्दपारीत केलेले गुन्हेगार – तपशीलवार माहिती
ऑक्टोबर २०२५ या महिन्यात खालील गुन्हेगारांना पुणे व रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुका हद्दीत ठराविक कालावधीसाठी हद्दपार करण्यात आले आहे:
१) ऋषिकेश दादाभाऊ बोरुडे – काळेवाडी – ६ महिने
मारहाण, जिवे धमकी, पैसे उकळण्याचा प्रयत्न अशा ३ गुन्ह्यांमध्ये सामील.
२) ज्योती गोरख राठोड – तळेगाव MIDC – ६ महिने
हातभट्टी दारू उत्पादन-विक्रीचे १२ गुन्हे.
३) स्वप्नील अरुण लांडे – तळेगाव दाभाडे – २ वर्षे
सरकारी कामात अडथळा, गंभीर दुखापत, महिला संबंधित गुन्हे – ४ गुन्हे.
४) राकेश मधुकर रेणुसे – शिरगाव – १ वर्ष
हातभट्टी दारू तयार करण्याचे ६ गुन्हे.
५) करिष्मा निर्मल राठोड – शिरगाव – ६ महिने
गावठी दारू उत्पादन-विक्रीचे ९ गुन्हे.
६) रविना विश्वास राठोड – शिरगाव – ६ महिने
गावठी दारू तयार-विक्रीचे ७ गुन्हे.
७) माला अनिल गुजांळ – वाकड – ६ महिने
दारू उत्पादन व गांजा विक्रीसंबंधी ४ गुन्हे.
८) सिद्धार्थ नागनाथ थोरात – तळेगाव दाभाडे – १ वर्ष
दारू उत्पादन-विक्रीचे ४ गुन्हे.
९) जय उर्फ किटक प्रविण भालेराव – तळेगाव दाभाडे – २ वर्षे
शस्त्राने वार, चोरी, महिला संबंधी गुन्हे – १० गुन्हे.
१०) निखील दत्तात्रय पोकळे – तळेगाव दाभाडे – २ वर्षे
घातक शस्त्रासह दरोड्याची तयारी – २ गुन्हे.
११) राजतिलक धर्मा राठोड – हिंजवडी – ६ महिने
गावठी दारू तयार करण्याचे ६ गुन्हे.
१२) लच्छाराम पुनाराम देवासी – बावधन – ६ महिने
हातभट्टी दारू उत्पादनाचे ४ गुन्हे.
१३) आंचिंता अनिरुद्ध रॉय – बावधन/सुस – ६ महिने
गावठी दारू उत्पादनाचे ३ गुन्हे.
१४) संदीप रमेश सूर्यवंशी – शिरगाव – १ वर्ष
गावठी दारू तयार करण्यासाठी गुळ-रसायन भिजवताना रंगेहाथ पकडले – ४ गुन्हे.
१५) विशाल उर्फ साकी संजय गायकवाड – वाकड – २ वर्षे
मारहाण, दहशत, बेकायदेशीर मोर्चा, फसवणूक – ५ गुन्हे.
१६) निलेश शंकर वाघमारे – वाकड – २ वर्षे
मारहाण, चोरी, वाहन फोडणे, अश्लील भाषा – ५ गुन्हे.
१०० पेक्षा अधिक गुन्हेगारांवर पोलिसांचे सतत लक्ष
परिमंडळ २ मधील १०० हून अधिक रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर पोलीस सतत लक्ष ठेवून आहेत. गुन्हेगारांना गुन्हे करण्यापासून परावृत्त करण्यासाठी पोलीस आणखी कडक कारवाई करणार असल्याची माहिती पोलीस विभागाने दिली आहे.
पोलिसांचे नागरिकांना आवाहन
हद्दपार गुन्हेगार आपल्या हद्दीत दिसल्यास तात्काळ खालील ठिकाणी संपर्क साधावा –
नियंत्रण कक्ष : ११२
जवळचे पोलीस स्टेशन
“शहर सुरक्षित ठेवण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे,” – पोलीस उप-आयुक्त विशाल गायकवाड



