Home ताज्या बातम्या देशात कोरोना बाधितांची संख्या 31 वर गेली

देशात कोरोना बाधितांची संख्या 31 वर गेली

0

नवी दिल्ली, 6 मार्च 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-आणखी एक संशयित रुग्णाला कोविड-19 ची लागण झाल्याचे तपासणीत सिद्ध झाले आहे. हा रुग्ण थायलंड आणि मलेशियाला जाऊन आला आहे. सध्या त्याला रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर आहे. यामुळे देशात कोरोना बाधितांची संख्या 31 वर गेली आहे. यात 16 इटालियन नागरिकांचा समावेश आहे.

आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या सूचनेनुसार भारतात येणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांची वैद्यकीय तपासणी अनिवार्य करण्यात आली आहे. आणखी 9 विमानतळांसह आता एकूण 30 विमानतळांवर तपासणी केली जात आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने कोविड-19 बाबत राष्ट्रीय स्तरावर प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे. आरोग्य सचिव प्रीती सुदान यांनी या कार्यक्रमाचे उद्‌घाटन केले. विविध राज्यांतून 280 आरोग्य अधिकारी यात सहभागी झाले होते.(Release ID: 1605512)

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

two × 4 =

error: Content is protected !!
Exit mobile version