Home ताज्या बातम्या पिंपरी-चिंचवडमध्ये रोडरोमियोंवर कारवाई

पिंपरी-चिंचवडमध्ये रोडरोमियोंवर कारवाई

0

पिंपरीतील जय हिंद कॉलेज, डॉ.डी.वाय पाटील कॉलेज संत तुकारामनगर आणि चिंचवड मोहननगर येथील प्रतिभा महाविद्यालयाच्या आवारात पिंपरी पोलिसांनी आज (गुरुवार) पुन्हा कारवाई केली. शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी नसताना देखील शाळेच्या आवारात आणि गेट समोर उभे राहून टवाळक्या करणाऱ्या ३५ रोडरोमियोंना ताब्यात घेण्यात आले. तसेच बेशिस्त ३३ वाहनांवर कारवाई करण्यात आली.

पिंपरी पोलिसांनी शाळा महाविद्यालये बाहेर होणाऱ्या गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी बुधवार (दि.२९) पासून कारवाई करण्यास सुरुवात केली होती. पोलिसांनी आज (गुरुवार) पुन्हा सकाळी दहा ते दुपारी एकच्या दरम्यान पिंपरीतील जय हिंद कॉलेज, डॉ.डी.वाय पाटील कॉलेज संत तुकारामनगर आणि चिंचवड मोहननगर येथील प्रतिभा महाविद्यालयाच्या आवारात पुन्हा कारवाई करुन ३५ रोडरोमियोंना ताब्यात घेतले. तसेच त्यांच्या पालकांना बोलवून त्यांच्या समोर या रोडरोमियोंना समज दिली असून त्यांच्यावर मुंबई पोलीस अधिनियमान्वये कारवाई करुन सोडून देण्यात आले.u

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

seventeen − 4 =

error: Content is protected !!
Exit mobile version