देहुरोड दि.१६ एप्रिल २०२०(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी): – देहुरोड मध्ये सासूच्या मृत्युनंतर डॉक्टरांचे वैद्यकीय प्रमाणपत्र किंवा स्मशान दाखला न घेता सासूचा मृतदेहाचे केले दहन. याबाबत सुनेसह चार जणांनवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (दि. 12 एप्रिल) शिवाजीनगर, देहूरोड येथे घडली.
हि घटना समजताच श्रीजीत रमेशान (नॅशनल आर टी आय कार्यकर्ता) यांना माहिती कळताच त्यांनी सदर स्मशान भुमीत जाऊन माहिती घेऊन सर्व माहिती फोटो व व्हिडीओ बनवुन सोशल मिडियाच्या माध्यमातुन सदर घटना देहुरोड कॅन्टोन्मेट बोर्ड प्रशासन व पोलिस प्रशासनाच्या नजरे समोर आणुन दिली. देहुरोड कॅन्टोन्मेट प्रशासनाने तत्काळ चौकशी करुन अॅक्शन घेतली,या प्रकरणात देहुरोड विकास समीती कनव्हर्ट महाराष्र्ट विकास समीतीच्या प्रमुख पदिधिकारी कार्यध्यक्ष-पंकज गोपाळराव तंतरपाळे,अध्यक्ष-.रेव सोलोमोनराज भंडारे,उपाध्यक्ष-राजु मारीमुत्तु वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे समाजसेवा आणि प्रसिद्धिच्या नांदात कायदा सुव्यवस्था व शासकीय प्रोसिजर याचे भान राहिले नाही,असे झालेल्या घटनेतुन दिसुन येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १५ एप्रिल २०२० रोजी देहुरोड कॅन्टोमेंन्ट बोर्ड देहुरोड तर्फे महमदरफी अल्लाउददीन सय्यद (वय-५४वर्ष)-आरोग्य निरीक्षक देहुरोड कॅन्टोमेंट बोर्ड यांनी फिर्याद दिली आहे.
अरोपी मयताची सुन
१)श्रीमती शोभा शंकर शिंदे (वय वर्षे ४०) रा.मु पो सांगवी ता.बारामती जि.पुणे सध्या रा.शिवाजीनगर वसाहत वार्ड
कमांक ४ देहुरोड
२).पंकज गोपाळराव तंतरपाळे,(रा.देहुरोड)
३).रेव सोलोमोनराज भंडारे(रा.देहुरोड)
४).राजु मारीमुत्तु (रा देहरोड) ५).गोविंद मंचल
(स्मशानभुमी तील वॉचमन ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे,
अरोपी शोभा शिंदे यांची सासु मयत गंगुबाई बबन शिंदे (वय 82) यांचा शिवाजीनगर, देहूरोड येथे राहत्या घरी आजारपणा मुळे आणि वृद्धापकाळाने मृत्यु झाला.त्यानंतर त्यांचा अंत्यविधी करण्यासाठी नियमानुसार डॉक्टरांचे प्रमाणपत्र घेऊन कॅन्टोन्मेंट बोर्ड देहूरोड यांच्याकडून स्मशान दाखला मिळवून रीतसर अंत्यविधी करणे अपेक्षित होते. मात्र शिंदे यांनी वॉर्डातील नगरसेवक गोपाळ तंतरपाळे यांचा मुलगा पंकज गोपाळ तंतरपाळे आणि अन्य काही जणांच्या मदतीने सासूचा अंत्यविधी केला. दरम्यान स्मशानभूमीतील वॉचमनने मयताचा स्मशान दाखला न पाहता त्यांना बेकायदेशीर पणे स्मशानभूमीत प्रवेश दिला.
कॅन्टोंमेट बोडीचे नियमानुसार जन्म मृत्यु नोंदणी अधिनियम १९६९ अन्वये मृत्युची माहिती कळविणे कर्तव्य आहे,तसेच महाराष्ट्र शासनाचे कोरोना विषाणु (कोवीड १९) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथीचे रोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ लागु करण्यात आला असुन सदर मयताचे मृत्यूचे कारण माहिती करून घेणे अत्यंत गरजेचे होते,या प्रकारामुळे कोरोना विषाणूचा प्रसार होण्याची दाट शक्यता निर्माण झाली. मृत्यू झालेल्या महिलेच्या मृत्यूचे कारण माहिती न करता मृतदेहाची विल्हेवाट लावली. याबाबत सुरुवातीला देहूरोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर भारतीय दंडविधान कलम 188, 297 आणि 201 नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. देहूरोड पोलीस पुढील अधिक तपास करीत आहेत.