Home ताज्या बातम्या पुण्यात कोरोनाचा पहिला बळी ! ५२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

पुण्यात कोरोनाचा पहिला बळी ! ५२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

0

महाराष्ट्रातला पहिला कोरोनाबाधित रूग्ण पुण्यात सापडला होता

पुणे,दि.३० मार्च २०२०(प्रजेचा विकास न्युज प्रतिनीधी):- महाराष्ट्रात कोरोना व्हायरसची लागण सर्वात आधी झाली होती. पुण्यात कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. ५२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला असुन. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. पुण्यात कोरोनाचा हा पहिला बळी आहे. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यातील कोरोनाबाधित मृतांचा आकडा आठ झाला आहे.त्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. काहीच दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील पहिले कोरोनाग्रस्त दाम्पत्य अगदी ठणठणीत बरे होऊन घरी गेले. ही समाधानकारक बाब समोर आल्यानंतर आज कोरोनाचा पुण्यात पहिला बळी गेल्याची माहिती मिळाली.संबंधित रुग्ण हा मधुमेही होता. उच्च रक्तदाबाचाही त्याला त्रास होता. उपचार सुरू असताना त्याची कोरोना चाचणी घेण्यात आली. त्यात त्याला कोरोनाचीही लागण झाली असल्याचे स्पष्ट होते. शरीरातील अनेक अवयव निकामी झाल्याने आज त्यांचा मृत्यू झाला.पुण्यात आणखी ३ कोरोनाग्रस्त,या व्यक्तीचा परदेश दौरा झाला होता का? याबाबत अद्याप कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही.पुण्यात दुबईहून फिरून आलेल्या दाम्पत्याला पहिली कोरोनाची लागण झाली होती. पिंपरी चिंचवड आणि पुणे असून मिळून आतापर्यंत ४३ कोरोनाबाधित रूग्ण सापडले होते. पिंपरी चिंचवडमध्ये सुरुवातीला कोरोना बाधित झालेल्या तीन रुग्णांना काही दिवसांपूर्वी घरी सोडण्यात आले. हे तीन ही रुग्ण दुबईवरून आले होते. १४ दिवसानंतर घेतलेल्या दुसऱ्या चाचणीचा अहवाल ही गुरुवारी रात्री उशिरा निगेटिव्ह आल्यानंतर या रुग्णांना आज घरी सोडण्यात आले.यावेळी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी आणि नागरिकांनी टाळ्या वाजवत या रुग्णांना निरोप दिला. पिंपरी चिंचवड शहरात कोरोना बाधित १२ रुग्ण होते, त्यातल्या तीन जणांना आता घरी सोडण्यात आलं आहे. विशेष म्हणजे गेल्या सात दिवसात शहरात कोरोनाचा एक ही रुग्ण वाढलेला नाही.पुणे शहरातील २६ व ग्रामीण भागातील पाच असे एकूण ३१ कोरोनारुग्ण आढळले असून पिंपरी-चिंचवडचे १२ मिळून पुणे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ४३ झाली आहे. उपचारांनंतर कोरोनामुक्त झालेल्या एकूण १५ रुग्णांना घरी पाठविण्यात आले आहे. एकाचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात सक्रि़य कोरोनाबाधितांची संख्या २७ झाली आहे. या सर्वांवर रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

12 + 7 =

error: Content is protected !!
Exit mobile version